
अकोल्यातल्या प्रभाग क्रमांक 8 मधील लहरिया नगर, नागेवाडी, वाकापूर प्रभागातील रहिवाशांनी हे आंदोलन केलं.

संतप्त झालेल्या महिलांनी आयुक्त यांच्या कार्यालासमोर माठ फोडले. कळसी व हांडे फेकून निषेध केला.

आंदोलनकर्त्या महिलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला.

अकोल्यात प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांनी पाणी पुरविण्याच्या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन केलं. यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या.

गेल्या चाळीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिला संतापल्या. दर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.