विनोदी अंदाज केलेली काजोलची पोस्ट व्हायरल; म्हणतेय, ‘तिच लोकं अधिक सुंदर असतात जी…’
अभिनेत्री काजोल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काजोल आनंदी दिसत आहे... शिवाय लोकांबद्दल देखील अभिनेत्रीने स्वतःचं विनोदी मत मांडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल (Kajol) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील काजोल कायम तिच्याा सौंदर्यामुळे चर्चेत असते. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

काजोल बद्दल सांगायचं झालं तर, आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने विनोदी कॅप्शन देखील लिहिलं आहे.

साडीमध्ये फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, माझ्या पोस्ट्सना पसंती देणारे लोक, पसंती न देणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आनंदी, अधिक बुद्धिमान आणि अधिक सुंदर असतात — अर्थात, हा अभ्यास मी स्वतःच बनवला आहे.' सध्या काजोल हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसणारी काजोल साडीमध्ये मात्र प्रचंड सुंदर दिसते. काजोल कायम ट्रेंडनुसार साडी नेसताना दिसते. आता देखील अभिनेत्रीने साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे.