
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही क्लासी आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

हटके ड्रेसमध्ये काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने खास कॅप्शन देखील दिलं आहे... सध्या सर्वत्र काजोल हिच्या लूकची चर्चा रंगली आहे...

फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शन मध्ये म्हणाली, 'या चेहऱ्याने गोष्टी पाहिल्या आहेत. बहुतेक मूर्खपणा...' काजोलच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

अनेक सिनेमांमधून काजोल चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.