न्यूटनचा सिद्धांत सांगत काजोलने केलीये लक्षवेधी पोस्ट, कॅप्शनने वेधलं अनेकांचं लक्ष
अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. पण अभिनेत्री तिच्या फोटोंमुळे कमी पण कॅप्शनमुळे अधिक चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. पण अभिनेत्रीच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे... जाणून घ्या अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये काय लिहिलं आहे.

अभिनेत्री काजोल कामय सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये न्यूटन यांचा सिद्धांत सांगितला आहे...
काजोल हिने साडीत स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'जेव्हा न्यूटन यांनी म्हटलं, "विरामस्थितीत असलेली वस्तू विरामस्थितीतच राहते," तेव्हा ते माझ्याबद्दलच बोलत होता.', सध्या अभिनेत्रीची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. काजोल झगमगत्या विश्वात पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.
साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
90 च्या दशकात काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता बॉलिवूडपासून दूर असलेली कजोल सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.