
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे ) सिनेमात अभिनेत्री काजोल आणि अभिनेता शाहरुख खान याने महत्त्वाची भुमिका साकारली आहे. आता सिनेमाच्या संबंधी काजोल हिने पोस्ट शेअर केली आहे.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे ) च्या 30 वर्षांच्या निमित्ताने शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनच्या प्रतिष्ठित लेस्टर स्क्वेअरमध्ये राज आणि सिमरन यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केलं.

काही फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 30 वर्षांनंतर आणि राज आणि सिमरन आता लेस्टर स्क्वेअरवर एकत्र आहेत! आणि ते फक्त तुमच्यामुळेच शक्य झाले आहे.... असं म्हणत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने 90 च्या दशकात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल बॉलिवूडपासून दूर आहे. चाहत्यांमध्ये आजही तिची क्रेझ आहे.

सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.