
19 सप्टेंबर 1980 रोजी आंध्र प्रदेशच्या विजयनवाडा येथे मेघना नायडूचा जन्म झाला. मुंबईत ती लहानाची मोठी झाली. कॉलेजच शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडलिंग सुरु केली. या दरम्यान तिने अनेक छोटे-मोठे रोल केले.

2003 साली मेघना नायडूला 'कलियों का चमन' गाण्याची संधी मिळाली. त्यातून ती फेमस झाली. त्यानंतर मेघनाने दुसऱ्या अन्य म्युझिक अल्बममध्ये काम केलं. तिची गाणी लोकांना आवडायची. आजही या गाण्यांना फॅन फॉलोइंग आहे.

मेघना नायडूने बॉलीवूडमध्ये 'रेन', 'हवस', 'माशूका', 'क्या कूल हैं हम 3' सारखे चित्रपट केले. त्याशिवाय मेघनाने तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटात अभिनय केला.

2011 साली मेघना नायडू टेनिस प्लेयर लुईस मिग्यूल रीस सोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2016 साली मेघनाने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. त्यानंतर दोघे दुबईला शिफ्ट झाले.

चित्रपटात कामाच्या निमित्ताने मेघना नायडू भारतात येत असते. इन्स्टाग्रामवर ती खूप एक्टिव आहे. फॅन्ससाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. वयाच्या 45 व्या वर्षीही मेघना नायडू तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते.