रोज मरे त्याला कोण रडे! मुंबईजवळील शहरात विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीतच विघ्न, नेमकं काय घडलं?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा केला होता, पण तो फोल ठरला. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागला.

| Updated on: Sep 07, 2025 | 2:01 PM
1 / 8
गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा दावा फोल ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, गणरायाचे आगमन आणि आता विसर्जनही खड्ड्यातूनच होत आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या मिरवणुकीतच विघ्न आल्याचे पाहायला मिळत आहे.

2 / 8
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्याच निवासस्थान बाहेर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. जर आयुक्तांच्या घरासमोरील रस्तेच असे असतील, तर शहरातील सामान्य नागरिकांच्या रस्त्यांची काय अवस्था असेल? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

3 / 8
गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी शहराला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ठेकेदारांना तातडीने दुरुस्ती करण्याची सूचनाही देण्यात आली होती.

4 / 8
मात्र प्रत्यक्षात हा दावा पोकळ ठरल्याचे चित्र दिसत आहे. गणेश मंडळांना आणि नागरिकांना गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच करावे लागले. त्यानंतर आता विसर्जन मिरवणुकाही याच खड्ड्यांतून मार्ग काढताना दिसत आहेत.

5 / 8
कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात आयुक्तांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थानासमोरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी हे खड्डे सिमेंटचे ब्लॉक टाकून तात्पुरते बुजवण्यात आले होते.

6 / 8
पण पावसाने आणि वाहतुकीने या तात्पुरत्या दुरुस्तीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. आयुक्त अभिनव गोयल याच रस्त्यावरून रोज ये-जा करतात. तरीही त्यांच्या घरासमोरील रस्त्याची ही अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

7 / 8
गणेश विसर्जनाच्या पवित्र दिवशीही रस्त्यांची ही दुर्दशा कायम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. जेव्हा शहराचे प्रमुखच आपल्या घरासमोरील रस्त्याची काळजी घेऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांनी शहरातील इतर रस्त्यांवर नियंत्रण कसे ठेवले असेल?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

8 / 8
गणेश भक्त आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या या कामावर टीका केली आहे. नागरिकांच्या मते, प्रशासन केवळ आश्वासन देतं. पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नागरिकांचा हा संताप केडीएमसी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.