‘कमळी’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच हलणार पाळणा; पहा डोहाळेजेवणाचे फोटो

'कमळी' या मालिकेत राधिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर गरोदर असून लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे. नुकताच तिचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Dec 19, 2025 | 10:38 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' या मालिकेत राधिकाची (ऋषीची वहिनी) भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर लवकरच आई होणार आहे. नुकताच तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
सईने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतही भूमिका साकारली होती. या मालिकेतील कलाकारसुद्धा सईच्या डोहाळेजेवणाला उपस्थित होते. 'कोणी येणार गं' असं कॅप्शन लिहित सईने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
निळ्या रंगाची काठपदराची साडी, हातात हिरव्या बांगड्या,  फुलांचे दागिने.. असा हा तिचा लूक आहे. या फोटोंमध्ये सई अत्यंत सुंदर दिसत असून गरोदरपणातील सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर सहज पहायला मिळत आहे.

4 / 5
सई कल्याणकरने 2021 मध्ये प्रशांत चव्हाणशी लग्न केलं. सईच्या पतीने पीएचडी केल्याचं त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद आहे. सईने काही लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यात 'ठिपक्यांची रांगोळी', 'दख्खनचा राजा ज्योतिबा' यांचा समावेश आहे.

5 / 5
सध्या साई 'कमळी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. सईच्या या फोटोंवर अमृता देशमुख, केतकी कुलकर्णी, विजया बाबर यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.