Kamlesh Sawant : तोंडावर थुंकेल तुझ्या; ‘दृश्यम’ फेम गायतोंडेला पाहताच महिलांचा चढायचा पारा, नेमकं काय झालं?

Kamlesh Sawant : अभिनेते कमलेश सावंत यांनी फक्त मराठीच नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या भेटीस आहे. पण 'दृश्यम' सिनेमातील 'गायतोंडे' भूमिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अशात एका मुलाखतीत सावंत यांनी मोठा खुलासा केला, त्यांना पहिल्यानंतर महिलांचा पारा चढायचा, तेव्हा नेमकं काय झालं जाणून घ्या...

| Updated on: Nov 15, 2026 | 12:43 PM
1 / 5
अभिनेते कमलेश सावंत यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत 'दृश्यम' सिनेमामुळे प्रचंड वाढ वाढ झाली. सिनेमात त्यांनी पोलीस अधिकारी गायतोंडे ही भूमिका साकारली आणि चाहत्यांनी त्यांना डोक्यावर  घेतलं. आता पण त्यांनी जे सांगितलं ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

अभिनेते कमलेश सावंत यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत 'दृश्यम' सिनेमामुळे प्रचंड वाढ वाढ झाली. सिनेमात त्यांनी पोलीस अधिकारी गायतोंडे ही भूमिका साकारली आणि चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. आता पण त्यांनी जे सांगितलं ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

2 / 5

मुलाखतीत कमेलश म्हणालेले, 'त्या ठिकाणी ज्या महिला उभ्या आहेत ना, त्यांनी तुमच्यासाठी एकम मेसेज पाठवला आहे. 'त्या नीच माणसाच्या समोर आम्हाला यायचं नाही. पण त्याला सांगा 'नाईस परफॉर्मन्स...' तर मी म्हणालो 'हा धन्यनवाद...'

3 / 5

कमलेश असं देखील म्हणाले होते की, त्यानंतर एक महिला मोठी डेअरिंग करत आली आणि म्हणाली, 'तुझ्या तोंडावर थुंकण्याची इच्छा होते. पण चांगलं काम केलं... तिला पण मी धन्यवाद म्हणालो. त्यानंतर दुसऱ्या बाईने डेअरिंग केली, 'चपलेने मारण्याची इच्छा होते तुला... पण चांगलं काम केलं... तिला पण मी धन्यवाद म्हणालो.

4 / 5

पुढे कमलेश म्हणाले, 'पण कोणीच माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभं राहत नव्हतं. बायका नाही फोटो काढायच्या माझ्यासोबत... तोंडावर अपमान करुन जायच्या...', असं देखील कमलेश म्हणाले.

5 / 5

कमलेश सावंत यांना त्यांच्या अभिनयासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. ‘झाला बोभाटा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आजही पुरस्काराची बाहुली त्यांनी घरात जपून ठेवली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us