AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dandruff Home Remedies: हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढलाय? सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवामानामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या वाढते. त्यामुळे टाळूला खाज येणे आणि केसांमध्ये पांढरा कोंडा दिसणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी काही घरगुती उपाय करून कोंड्याचा त्रास कमी करता येऊ शकतो, ते जाणून घेऊया.

Dandruff Home Remedies: हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढलाय? सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढलाय? Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 15, 2026 | 12:21 PM
Share

हिवाळ्यातील गुलाबी थंडी, उबदार कपडे आणि गरमागरम चहाचा आनंद प्रत्येकालाच आवडतो. मात्र, या ऋतूत थंड आणि कोरड्या हवामानामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. त्यापैकीच एक म्हणजे केसांमधील कोंडा. टाळू कोरडी पडल्यामुळे केसांमध्ये पांढरा कोंडा दिसू लागतो, तसेच खाज आणि अस्वस्थतेचाही त्रास होऊ शकतो. डँड्रफमुळे केसांचे सौंदर्यही कमी होते. तुम्हालाही हिवाळ्यात या समस्येचा सामना करावा लागत असेल तर महागडे शॅम्पू किंवा केमिकल ट्रीटमेंट घेण्याआधी काही सोपे घरगुती उपाय ट्राय करू शकता. चला तर जाणून घ्या हिवाळ्यात डँड्रफचा त्रास कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतात.

कोमट तेलाने मसाज

हिवाळ्यात कोंडापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोमट तेलाने नियमितपणे केसांना मसाज करा. यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेल हलके गरम करा आणि आता या तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. या नैसर्गिक तेलांमुळे तुमच्या स्काल्पला आवश्यक ओलावा मिळेल आणि कोंड्याची समस्या कमी होईल.

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइल कोंडा कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तुमच्या नेहमीच्या शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकून केस धुवा. तसेच तुम्ही तुमच्या हेअर ऑइलमध्ये सुद्धा टी ट्री ऑइलचे काही थेंब घाला आणि ते केसांना लावा. टी ट्री ऑइल थेट केसांना कधीच लावू नये. ते इतर तेलात मिक्स करुन लावा. हे तेल लावल्याने तुम्हाला जळजळ आणि खाज येण्याचा त्रास होऊ शकतो.

एलोवेरा जेल

केसांसाठी एलोवेरा जेल खूप चांगले म्हटले जाते. कोंडा दूर करण्यासाठी केसांच्या मुळांवर ताजे कोरफड लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा. कोरफड फक्त कोंडा कमी करत नाही तर केसांच्या इतर समस्या, स्काल्पची खाजही कमी करतो.

लिंबू

तुमच्या जेवणाची चव वाढवणारे लिंबू केसातील कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. लिंबाचा रस टाळूचा पीएच संतुलित करून कोंडाशी लढण्यास मदत करते. लिंबाचा रस कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. ५-१० मिनिटांनी केस चांगले धुवा. हे खूप प्रभावी उपाय आहे.

मेथी

केसांसाठी मेथी प्रभावीपणे काम करते. मेथीमधील अँटी फंगल गुण कोंडा दूर करते. मेथी रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी या मेथीची पेस्ट बनवा आणि केसांना लावा. साधारण एक तासानंतर केस धुवा. केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Follow Us
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला