Kapil Sharma: कपिल शर्माची मुलं झाली मोठी; मुलगा तर वडिलांचीच कार्बन कॉपी, नेटकरी म्हणाले..

Kapil Sharma: कपिल शर्माने गणेशोत्सवादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्याची दोन्ही मुलं आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. कपिलची मुलं किती लवकर मोठी झाली, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

| Updated on: Sep 18, 2026 | 11:27 AM
1 / 5
Kapil Sharma: कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या विनोदी अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी कपिल त्याच्या कामामुळे नव्हे, तर त्याच्या कुटुंबामुळे चर्चेत आला आहे. कपिलने इन्स्टाग्रामवर गणेशोत्सवातील एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये कपिलचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे.

2 / 5

कपिल आणि गिन्नीची दोन्ही मुलं याच चांगलीच मोठी झालेली दिसत आहेत. अनायरा असं त्यांच्या मुलीचं नाव असून मुलाचं नाव त्रिशान आहे. कुटुंबाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांचं लक्ष विशेषतः कपिलच्या मुलांकडे गेलं आहे.

3 / 5

मुलगा त्रिशान हा कपिलचीच कार्बन कॉपी असल्याचे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. मुलगी अनायरा आता पूर्वीपेक्षा मोठी झाल्याचं दिसत असून ती आई गिन्नीवर गेल्याचं काहींनी म्हटलंय.

4 / 5

कपिल आणि गिन्नी यांनी 2018 मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांची मुलगी अनायराचा जन्म 2019 मध्ये झाला, तर मुलगा त्रिशानचा जन्म 2021 मध्ये झाला.

5 / 5

कपिल शर्मा आणि गिन्नी छत्रथ ही जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. आता त्यांच्या मुलांचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांकडून या स्टारकिड्सच्या क्यूटनेसचं कौतुक होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us