
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करिश्माचं सौंदर्य फुलून दिसत आहे. काही फोटोंमध्ये अभिनेत्री पोज देताना दिसत आहे.करिश्मा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. स्वतः फिट राहून अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.