
बॉलीवूड अभिनेत्री करिश्माचा जन्म २५ जून १९७४ रोजी कपूर खानदानात झाला, करिश्माने ९० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केले होते.

करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी शिक्षण अर्ध्यावरच सोडले. लहानपणी करिश्मा श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांना गुरु मानत होती.

करिश्माने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 'प्रेम कैदी' या चित्रपटाद्वारे तिने रुपेरी पडद्यावर पदापर्ण केले, हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

करिश्मा हीने 'राजा बाबू', 'राजा हिंदुस्तानी', 'दिल तो पागल है', 'जुबैदा' सारख्या चित्रपटात भूमिका केल्या.एकेकाळी करिश्मा सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती.

करिश्मा कपूरचा बॉलिवूडमध्ये एक काळ होता. तिचे संपूर्ण कुटुंब बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही चांगली कारकीर्द घडवली आहे.तर आज आपण करिश्मा कपूरच्या कुटुंबाबद्दल बोलू.

करिश्मा कपूरने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर काही महिने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये शिक्षण घेतले. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले.

करिश्मा कपूरचे आजोबा अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांना शोमॅन म्हटले जाते.अभिनेते ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे तिचे काका आहेत, तर अभिनेत्री नीतू सिंग ही तिची काकू आहे. अभिनेता रणबीर कपूर तिचा चुलत भाऊ आहे.

करीना कपूर ही करिश्मा कपूरची धाकटी बहीण आहे. करीनाचे लग्न अभिनेता सैफ अली खानशी झाले आहे. करीना आणि सैफ अली खान यांनाही दोन मुले आहेत.

करिश्मा कपूरला घरी "लोलो" म्हटले जाते. तिचे वडील पंजाबी आहेत आणि आई ब्रिटिश वंशाची आहे. तिचे वडिल रणधीर कपूर १९८८ मध्ये वेगळे झाले होते. त्यानंतर तिचे संगोपन तिची आई बबिता हिने केले. अनेक वर्षे वेगळे राहिल्यानंतर, २००७ मध्ये तिचे आई-वडील पुन्हा एकत्र आले.

नंतर अभिनेत्री करिश्मा हीने २००३ मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. पण हे नातेही १३ वर्षांनी संपले आणि २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. संजय कपूरपासून करिश्माला दोन मुले आहेत, मुलगा कियान कपूर आणि मुलगी समायरा कपूर.