माझ्यावर मित्रासोबत झोपण्यास दबाव टाकला; करिश्माने पूर्व पतीवर केले होते धक्कादायक आरोप

करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचे निधन झाले आहे. पण लग्नाच्या सुरुवातीपासूनच करिश्मा आणि संजयचे फार जुळलं नाही.

| Updated on: Jun 13, 2025 | 10:45 AM
1 / 5
करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि व्यावसायिक संजय कपूरचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी यूकेमध्ये पोलो खेळताना त्याचे निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच मृत्यू झाला. पण तुम्हाला माहित आहे का की करिश्मा आणि संजय कपूर यांचा विवाह खूपच तणावपूर्ण होता? करिश्माने संजय कपूरवर घटस्फोटाच्या कायदेशीर लढाईदरम्यान अनेक गंभीर आरोप केले होते.

2 / 5
करिश्मा कपूरने 29 सप्टेंबर 2003 रोजी मुंबईतील आपल्या कृष्णा राज बंगल्यात पारंपरिक शीख पद्धतीने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले होते. या जोडप्याला समायरा आणि कियान नावाची दोन मुले आहेत. 2014 मध्ये संजय आणि करिश्माने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मात्र, 2015 मध्ये त्यांनी आपली संमती मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला आणि त्यांचा घटस्फोट हाय-प्रोफाइल केस बनले. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले.

3 / 5
अहवालानुसार, करिश्माने संजयवर धक्कादायक आरोप करत दावा केला की त्याने तिला विकण्याचा प्रयत्न केला होता. करिश्माने आपल्या एका याचिकेत हनीमूनच्या घटनेचा उल्लेख केला होता. अभिनेत्रीने कथितपणे सांगितले होते की संजय कपूरने तिला विकण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्याच्या मित्रांसोबत झोपण्यास भाग पाडले होते. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा संजयने अभिनेत्रीला मारहाण केली आणि तिची किंमत देखील त्याच्या एका मित्राला सांगितली.

4 / 5
2016 मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूर सासूविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये तिच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. करिश्माने दावा केला की जेव्हा ती गर्भवती होती, तेव्हा संजयने त्याच्या आईला सांगितले होते की जर ती ड्रेसमध्ये बसू शकली नाही, तर तिच्या कानाखाली  मारा.

5 / 5
करिश्माने संजयविरुद्ध छळाचा खटला देखील दाखल केला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संजयला समन्स पाठवले होते. हे सर्व आरोप तेव्हा सुरू झाले जेव्हा करिश्माने दावा केला की संजय तिला आर्थिक मदत करण्यास तयार नाहीत. म्हणून तिने आपली संमती मागे घेतली आणि माध्यमांमध्ये वाईट आरोप लावण्यास सुरुवात केली. अखेरीस, 2016 मध्ये दीर्घ कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट मंजूर केला. संजयने त्यानंतर 13 एप्रिल 2017 रोजी प्रिया सचदेवशी लग्न केले.