मी जे सहन केलं, तशी वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये..; करिश्मा कपूर असं का म्हणाली?

बिझनेसमन संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री करिश्मा कपूरचा अभिनेता अभिषेक बच्चनशी साखरपुडा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं. या ब्रेकअपनंतर दिलेल्या एका मुलाखतीत करिश्मा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

| Updated on: Jun 22, 2025 | 10:41 AM
1 / 6
अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. परंतु लग्नाच्या काही वर्षांतच या दोघांच्या संसारात खटके उडायला सुरुवात झाली. अखेर 2016 मध्ये संजय आणि करिश्मा यांनी घटस्फोट घेतला.

2 / 6
घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिषेक बच्चनसोबत झालेल्या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी माझा वापर करण्यात आला, असा आरोप संजयने करिश्मावर केला होता. इतकंच नव्हे तर तिने फक्त पैशांसाठी लग्न केलं, असंही त्याने म्हटलं होतं.

3 / 6
संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी करिश्माचं अभिनेता अभिषेक बच्चनशी साखरपुडा झाला होता. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा झाला होता. परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं संपुष्टात आलं होतं. ज्यावर्षी दोघांचा ब्रेकअप झाला, त्याच वर्षी करिश्माने संजयशी लग्न केलं होतं.

4 / 6

5 / 6
"मला एकटीलाच दु:खाला सामोरं जावं लागलं. कदाचित आता वेळच सगळ्या गोष्टी ठीक करू शकतो. मी बरंच काही सहन केलंय. पण माझ्यासोबत जे काही घडलंय, त्याचा मी स्वीकार केला आहे. मी इतकंच म्हणेन की नशिबात जे लिहिलंय, ते घडतं. परंतु मी माझ्या समस्यांचा सामना करण्यासाठा भावनिकदृष्ट्या तयार नव्हते", असं ती पुढे म्हणाली.

6 / 6
अशा कठीण काळात सर्वांनी तिला एकटं सोडल्याची तक्रार करिश्माने केली होती. ती एकटीच सर्व गोष्टींना सामोरं जात होती. "जर माझे आईवडील, बहीण, माझी आजी, माझ्या दोन्ही मावश्या आणि माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी माझ्यासोबत नसते, तर मी यातून कधीच बाहेर पडू शकली नसती", अशा शब्दांत ती व्यक्त झाली होती.