
बंगळुरू शहरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बंगळुरू संघाचे संपूर्ण खेळाडू उपस्थित होते. दरम्यान, याच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.

या चेंगराचेंगरीत आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय. अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार केला. मात्र गर्दीवरील नियंत्रण सुटल्याने ही चेंगराचेंगरी झाली.

या चेंगराचेंगरीत बाजूला उभ्या असलेल्या कारच्या काचा फुटल्या आहेत. तर या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 15 ते 20 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, एकीकडे चेंगराचेंगरी झाली असली तरी दुसरीकडे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मात्र खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे.

या चेंगराचेंगरीचे काही हृदयविदारक फोटो समोर आले आहेत. मोठ्या संख्येने गर्दी झाल्यामुळे लोकांना श्वास घेण्यासही अडचण येत होती. चेंगराचेंगरीत काही काही लोकांना तुडवण्यात आले आहे. त्यामुळे यात अनेकजण जखमी झाले आहेत.