Anirudh Ravichander-Kaviya Maran Wedding: रजनीकांत यांनी केलं सुनेचं जंगी स्वागत; काव्या मारनच्या सासरी कोण कोण? किती मोठा परिवार?

ग्रीसमधील खासगी विवाहसोहळ्यानंतर आता अनिरुद्ध आणि काव्या चेन्नईमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

| Updated on: Nov 12, 2026 | 12:22 PM
1 / 8
Anirudh Ravichander-Kaviya Maran Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालकीण काव्या मारन यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी ग्रीसमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या शाही विवाहसोहळ्याला चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Anirudh Ravichander-Kaviya Maran Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालकीण काव्या मारन यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी ग्रीसमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या शाही विवाहसोहळ्याला चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

2 / 8

या लग्नातील काही खास फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी पत्नी लता आणि कुटुंबीयांसह नवविवाहित जोडप्यासोबत फोटो काढले आहेत. या फोटोंमधून त्यांनी काव्याचं आपल्या कुटुंबात स्वागत केल्याची खास झलक पाहायला मिळतेय.

3 / 8

अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नातील काही इनसाइड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोत अनिरुद्ध आणि काव्या यांच्यासोबत रजनीकांत, त्यांची पत्नी लता आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन दिसत आहेत. दुसऱ्या एका कौटुंबिक फोटोत दोन्ही कुटुंबीय एकत्र आनंदाने पोझ देताना दिसतात. या फोटोंमध्ये नवविवाहित जोडप्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

4 / 8

अनिरुद्ध हा रजनीकांत यांचा पुतण्या आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या आईच्या बहिणी आहेत. त्यामुळे अनिरुद्धच्या लग्नाला उपस्थित राहणं त्यांच्यासाठी खास होतं. पुतण्याच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी त्यांनी संपूर्ण कुटुंबासह उपस्थिती लावली.

5 / 8

या विवाहसोहळ्याला रजनीकांत यांच्यासोबतच एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. काव्या मारन या सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. त्या सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ आणि सहमालकीण आहेत. त्यामुळे या लग्नाला मनोरंजन, राजकारण आणि उद्योगविश्वातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

6 / 8

अनिरुद्ध आणि काव्या यांनी 11 नोव्हेंबर ही खास तारीख लग्नासाठी निवडली होती. ग्रीसमध्ये समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुंदर पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. पांढऱ्या फुलांची सजावट, आकर्षक मंडप आणि फुलांच्या वर्षावात नवविवाहित जोडप्याने एकमेकांचा हात धरून प्रवेश केला.

7 / 8

अनिरुद्धचे वडील रवी राघवेंद्र हे तमिळ चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील अभिनेते आहेत. रवी राघवेंद्र हे त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे तमिळ चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध आहेत आणि त्यामुळेच त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. रवी राघवेंद्र यांची पत्नी आणि अनिरुद्धची आई लक्ष्मी रविचंद्रन या शास्त्रीय नृत्यांगना आहेत.

8 / 8

अनिरुद्धला वैष्णवी नावाची बहीणही आहे. रजनीकांत आणि लता यांच्या मुली ऐश्वर्या रजनीकांत आणि सौंदर्या रजनीकांत या अनिरुद्धच्या चुलत बहिणी आहेत. काव्या आणि अनिरुद्ध यांचं नातं रजनीकांत यांनीच जुळवून दिल्याचं म्हटलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us