PHOTO | काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती सफारीला आजपासून सुरुवात
काझिरंगा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर-पूर्व भारतातील आसाम राज्यात आहे. एक शिंगी गेंड्यासाठी ही उद्यान प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर 2006 पासून या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणूनही घोषित करण्यात आलं आहे. आजपासून या उद्यानात हत्ती सफारीही सुरु करण्यात आली आहे.

काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात आजपासून हत्ती सफारी सुरु करण्यात आली आहे.
- कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेलं आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यान 21 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलं आहे.
- त्यावेळी काझिरंगा रेंज, कोहोरा आणि बागोरी पर्यटकांसाठी जीप सफारी सुरु करण्यात आली होती. मात्र, आता राष्ट्रीय उद्यानातील हत्तीवरुन केली जाणारी सफर सुरु करण्यात आली नव्हती.
- 1 नोव्हेंबर म्हणजे आजपासून काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती सफारी सुरु करण्यात आली आहे.
- दरम्यान, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून काही नियमावली आखून देण्यात आली आहे.
- त्या नियमावलीनुसार राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून फक्त ३७ पर्यटकांना परवानगी दिली आहे.
- काझिरंगा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर-पू्र्व भारतातील आसाम या राज्यात आहे. गोलाघाट आणि नोआगांव या दोन जिल्ह्यांदरम्यान हे उद्यान आहे.
- हे उद्यान एक शिंगी गेंड्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण आहे.
- 2006 मध्ये या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणूनही घोषित करण्यात आलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us