
आपल्यापैकी जवळपास लोकांना सवय असते की, बाजारातून आणलेली प्रत्येक भाजी अगोदर फ्रीजमध्ये ठेवण्याची. मात्र, तुमची ही सवय अत्यंत वाईट आहे. ज्याचा परिणाम हा थेट आपल्या आरोग्यावर होतो.

जवळपास सर्वच लोक फ्रीजमध्ये काकडी ठेवतात. मात्र, फ्रीजमध्ये काकडी ठेवणे टाळा. 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात काकडी लवकर खराब होऊ लागतात. काकडी फ्रीमध्ये ठेवणे टाळाच.

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव कमी होऊ शकते. टोमॅटो नेहमी खोलीच्या तपमानावर ठेवा. आपण किचनमध्ये एखाद्या टोपलीमध्येही टोमॅटो ठेऊ शकतो.

बटाटे आज आपल्याला प्रत्येक किचनमध्ये बघायला मिळतात. मात्र, कधीच बटाटे फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका. यामुळे बटाटे खराब होतात आणि त्यांना कोंब देखील फुटतात.

कांदे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. कांदे फ्रिजमध्ये लवकर खराब होतात. थंड आणि हवेशीर जागेत कांदे ठेवा. कांदे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते लवकर खराब होतात.