Kerala trip : केरळला जाताय? या ठिकाणी नक्की भेट द्या, पिकनिक यादगार ठरेल
Kerala trip : तुमचा केरळला जायचा प्लान असेल, तर तुम्ही काही ठिकाणांना आवर्जून भेट द्यायला विसरू नका. या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुमची पिकनिक यादगार ठरेल.

भारतातील केरळ हे अनेक पर्यटकांच्या आवडीचं राज्य आहे. अनेकजण केरळमधील संस्कृती, मंदिर, खाद्यपदार्थांचं भरभरून कौतुक करतात. केरळला पिकनिकला गेला, तर काही विशिष्ट ठिकाणांना नक्की भेट द्या.
केरळला जात असाल, तर कोच्ची फोर्टला नक्की भेट द्या. या भागातील कॅफे अफलातून आहेत. केरळला जात असाल, तर कोच्ची फोर्टला जायला विसरू नका.
केरळमधील पोनमुडी एक सुंदर ठिकाण आहे. या शहरातील टी गार्डनला आवर्जून भेट द्या. पोनमुडीमधील निसर्गरम्य वातावरण मनाला मोहिनी घालेल. पोनमुडीपासून तिरुवंतपुरम हे 60 किलोमीटर दूर आहे.
तिरूंवतपुरमहून वर्कला येथे जाण्यासाठी दोन तास लागतात. वर्कलामध्ये समुद्र किनारा आहे. तसेच जनार्दन स्वामी मंदिर, अंजेगा किल्ला आहे. वर्कला क्लिप येथे सूर्योदयाचं विहंगम दृश्य नजरेस पडते.
मुनरो बेट हे कोल्लम शहरापासून एका तासाच्या अंतरावर आहे. या बेटावरील भेट तुम्हाला आयुष्यभर स्मरणात राहील. मुनरो बेटावर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात जाणे फायदेशीर ठरते.
केरळमध्ये काही भागात चहाचे मळे देखील आहेत. केरळच्या काही भागातील धबधबे भारतभर प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हजारो लोक धबधब्याच्या ठिकाणी भेट देतात.