
बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वीच राजस्थानमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न पार पडले आहे.

नुकताच कियारा अडवाणी ही जवानांच्या एका कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी कियारा अडवाणी हिला अनेक प्रश्न हे विचारण्यात आले. यावेळी बिनधास्तपणे बोलताना कियारा दिसली.

यावेळी एका जवानाने कियारा अडवाणी हिला विचारले की, लग्नानंतर किचनमध्ये सर्वात अगोदर तू कोणता पदार्थ तयार केला. यावर कियारा अडवाणी हिने मोठा खुलासा केला.

कियारा अडवाणी म्हणाली की, मी अजून काही बनवले नाहीये. फार तर फार मी फक्त किचनमध्ये पाणी गरम करण्यासाठी गेली असेल. माझा पती सिद्धार्थ मल्होत्रा याला जेवण तयार करायला खूप आवडते.

सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्यासाठी नेहमीच खास पदार्थ तयार करतो, पण मीच खाते. ब्रेड देखील सिद्धार्थ मल्होत्रा याला तयार करता येते. त्याला खूप जास्त कुकिंग करायला आवडते.