Kiran Mane: किरण मानेच्या लेकीला पाहिलेत का? करतेय नाटकात काम

Kiran Mane Daughter: अभिनेता किरण माने हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने त्याच्या मुलीचे काही फोटो शेअर केले होते. तुम्ही तिला पाहिलेत का?

| Updated on: Nov 11, 2025 | 11:33 AM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून किरण माने ओळखला जातो. अनेकदा तो समाजिक विषयांवर स्पष्ट मत मांडताना दिसतो. नुकताच किरण मानेने सोशल मीडियावर लेकीचे कौतुक केले आहे.

2 / 5
किरण माने हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकताच मुलीचे कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याची मुलगी सध्या काय करते हे देखील सांगितले आहे. सोबतच मुलीचे दिग्दर्शक रघुवीर यादव यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
किरण मानेच्या मुलीचे नाव ईशा आहे. ती सध्या नाटकांमध्ये काम करत आहे. तिने दोन नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. किरण मानेने सोशल मीडियावर तिच्या नाटकांमधील भूमिकांचे कौतुक केले आहे. ईशा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

4 / 5
लेकीचा फोटो शेअर करत किरण मानेने लिहिलं, आपलं लेकरू भारतीय रंगभूमीवर उभं रहातंय… ते सुद्धा रघुवीर यादव सारख्या कसलेल्या अभिनेत्याबरोबर! यासारखं दुसरं सुख नाही. रघुवीर यादव दिग्दर्शित आणि अभिनीत ‘मारे गये गुलफ़ाम’ नाटकात माझी मुलगी ईशा काम करतीय. परवा त्या नाटकाचा पहिला प्रयोग मध्य प्रदेशात भोपाळ येथे झाला. त्या प्रयोगाच्या आधी रघुवीरजींसोबत चर्चा करताना तिचा फोटो पाहिला आणि मन भरून आलं !

5 / 5
पुढे तो म्हणाला, …याचबरोबर ईशाची प्रमुख भुमिका असलेल्या ‘टेढी लकीर’ या स्मिता भारती दिग्दर्शित नाटकाचे प्रयोगसुद्धा मुंबईत सुरू आहेत. पार्थ झुत्शी सारख्या हिंदी नाटक सिनेमातल्या गुणी अभिनेत्याबरोबर तिनं तगडी भुमिका साकारलीय. ईशाचा उत्तम गायिका असण्याचा या दोन्ही नाटकांत खुप सुंदर उपयोग करून घेतला आहे.