या गाण्यावर कोट्यवधींमध्ये तयार झालेत रील्स, 51 वर्षांपासून प्रत्येकाचं प्रचंड आवडतं, आजही ऐकताच…

किशोर कुमार यांचं 51 वर्षांपासून प्रचंड चर्चेत आणि सुपरहिट असणारं गाणं, जे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये नक्की असतं. ज्यावर आतापर्यंत बनवले आहोत कोट्यवधींमध्ये रील्स.

| Updated on: Aug 02, 2026 | 2:18 PM
1 / 5
2 ऑगस्ट 2026 रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जात असताना मैत्रीची आठवण झाली की सर्वप्रथम आठवण येते ती 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' या सदाबहार गाण्याची. जवळपास पाच दशकांनंतरही हे गाणं मैत्रीचे प्रतीक म्हणून प्रत्येक पिढीच्या मनात तितक्याच प्रेमाने जिवंत आहे.

2 / 5
कॉलेज फेअरवेल, रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप डेचा उत्सव असो, हे गाणं आजही प्रत्येक मैफलीची शान ठरते. हे गाणे 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'शोले' चित्रपटातील असून अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या जय आणि धर्मेंद्र यांनी साकारलेल्या वीरू या जिवलग मित्रांवर चित्रित करण्यात आले होते.

3 / 5
एका बाइकवर बेधडक प्रवास करणाऱ्या जय-वीरूचा हा प्रसंग भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय सीनपैकी एक मानला जातो. या अजरामर गाण्याला किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी स्वर दिले आहेत.

4 / 5
सुमारे 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'शोले'ने त्या काळात सुमारे 35 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती. जय-वीरूची मैत्री आणि 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणं या चित्रपटाची सर्वात मोठी ओळख ठरले.

5 / 5
या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. 2010 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक म्हणून या गाण्याचा वापर करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us