
ऐश्वर्या नारकर यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी स्वत:च एक वेगळ स्थान निर्माण केलय.

ऐश्वर्या नारकर या उत्साहाच एक वेगळच रसायन आहेत. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्या सोशल मीडियावर तितक्याच सक्रीय असतात.

ऐश्वर्या नारकर यांनी आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करुन आपला ठसा उमटवला आहे. सहज सुंदर अभिनय आणि सौंदर्याचा मिलाफ म्हणजे ऐश्वर्या नारकर.

मराठीच नाही हिंदी मालिकांमध्येही ऐश्वर्या नारकर यांनी काम केलय. सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मराठी मालिकेत आणि बाते कुछ अनकही सी या हिंदी मालिकेत काम करत आहेत.

तुच माझी भाग्य लक्ष्मी, रणरागिणी, ओळख या मराठी चित्रपटात तर धडक, शेहझादा या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलय. मराठी-हिंदी मिळून त्यांनी आतापर्यंत 40 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलय.

ऐश्वर्या नारकर सध्या चर्चेत असतात. त्या त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडिओमुळे. सोशल मीडियावर त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

ऐश्वर्या नारकर यांचा विवाह अविनाश नारकर यांच्याबरोबर झाला. ते सुद्धा प्रसिद्ध अभिनेते आहेत. या जोडीने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवर साडीमधील त्यांचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असतात. या फोटोंमधील त्यांच्या अदा आजही अनेकांना घायाळ करतात.

ऐश्वर्या नारकर यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. पण त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या वयाचा अंदाजच बांधता येत नाही.

हिंदी चित्रपट सृष्टीत रेखाच एक स्थान आहे. अभिनया इतकच रेखाला प्रेक्षक तिच्या सौंदर्यासाठी लक्षात ठेवतात. रेखा आजही तितकची सुंदर वाटते. ऐश्वर्या नारकर यांना सुद्धा हेच लागू होते. मराठीतली जणू ती दुसरी रेखाच आहे.