
त्यांच्याकडे कार, घर, जमीन हे आहे का? पण अनेकांच्या मते, त्यांच्याकडे जर कोणी 10 रुपये जरी मागितले तरी ते त्यांच्याकडे नसतात. त्यांचे संपूर्ण जीवन संन्यास आणि भक्तीमार्गाला वाहिलेला आहे.

त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते प्रवासापर्यंतची सर्व व्यवस्था भक्त करतात. त्यांच्या भक्तात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.

वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांना असाच प्रश्न करण्यात आला. भाग्यात जे लिहिले आहे, ते बदलता येऊ शकत नाही का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर महाराजांनी एक सरळ, सोपे उत्तर दिले.

प्रेमानंद महाराज म्हणाले की व्यक्ती त्यांच्या कर्माच्या आधारे संकट टाळू शकतो. त्यामुळे मानवी जीवन वाया घालवू नका. वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करा. जितके समाजासाठी काम कराल. तितका तुम्हाला फायदा होईल.

वृंदावनचे लोकप्रिय प्रेमानंद महाराज (श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज), हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी अनेक जण त्यांच्याकडे येतात. पण त्यांची संपत्ती किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?


मात्र, जर तुम्हाला प्रेमानंद महाराजांना भेटायचे असेल तर सर्वात महत्वाचे आहे की, तुमच्याकडे आधारकार्ड असावे, आधारकार्ड असल्याशिवाय तुम्हाला आत सोडले जाणार नाही.