Shower Routine : आठवड्याभरात किती वेळा करावी अंघोळ ? तज्ज्ञ काय सांगतात ?

त्वचारोग तज्ञांच्या सांगण्यानुसार, अनेक वेळा अंघोळ केल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण स्वच्छता राखण्यासाठी देखील आंघोळ आवश्यक आहे. त्यामुळे खरंच किती वेळा आंघोळ करणे योग्य ठरते, ते जाणून घेऊया.

| Updated on: Jul 26, 2023 | 4:39 PM
1 / 5
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेची नीट काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. दिवसातून किती वेळा आंघोळ केली पाहिजे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?   दररोज आंघोळ करावी यावर सर्वांचेच एकमत असते पण अनेक त्वचारोग तज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा आंघोळ करणे देखील पुरेसे आहे. ते कसे हे जाणून घेऊया.

2 / 5
स्वच्छता राखण्यासाठी, नियमित आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. पण, काही दिवस अंघोळ न करणे हे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, जास्त आंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 5
 त्यामुळे केवळ आपली त्वचाच नाही तर आपले केसही कोरडे, दुभंगलेले आणि निर्जीव होऊ शकतात. तुम्ही किती वेळ आंघोळ करता यावरही ही गोष्ट अवलंबून असते.

4 / 5
3 ते 5 मिनिटे अंघोळ करावी, त्यावेळी शरीराचे सर्व भाग स्वच्छ करावेत, मळ काढावा. चेहरा, मान, कंबर, कोपर, गुडघे अशा सर्व जागा नीट स्वच्छ कराव्यात. प्रत्येक वेळेस स्क्रबिंग केलेच पाहिजे असे नाही.

5 / 5
मात्र त्वचेचा पोत, वय, कोणता ऋतू सुरू आहे, जीवनशैली कशी आहे, तसेच तुम्ही काय काम करता यावरही  किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून असते. उदाहरणार्थ - तुम्ही शेतात काम करत असाल किंवा जास्त कष्टाचे काम असेल तर घरी बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळा अंघोळ करावी लागेल.