तुम्हाला आपल्या विशाल आकाशगंगेची गुपितं माहितेय? वाचा अचंबित करणारी 10 रहस्य

| Updated on: Apr 27, 2021 | 5:17 PM

आपली आकाशगंगा (Miky Way) जीवसृष्टी असलेलं रहस्यमय अवकाशीय ठिकाण आहे. चला तर मग बघुयात या आकाशगंगेची 10 मोठी रहस्य.

1 / 11
आपली आकाशगंगा (Miky Way)  जीवसृष्टी असलेलं रहस्यमय अवकाशीय ठिकाण आहे. यात पृथ्वीसह अब्जावधींच्या संख्येत ग्रह आणि तारे आहेत. याबद्दल कुणालाच पूर्ण माहिती नाहीये. त्यामुळेच याबाबत हळूहळू माहिती घेत राहणं आणि आपल्या ज्ञानात भर पाडून सृष्टीच्या या विस्मयकारक रचनेला समजून घेणं आवश्यक आहे. चला तर मग बघुयात या आकाशगंगेची 10 मोठी रहस्य.

2 / 11
आपली आकाशगंगा एका डिस्कप्रमाणे आहे. त्यात धूळ, ग्रह आणि तारे या सर्वांचा समावेश आहे. पृथ्वीचा समावेश असलेली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून 26 हजार प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजेच जर त्या केंद्राजवळ जायचं ठरलं तर प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी 26 हजार वर्षे लागतील. आकाशगंगेचा आकार आणि पृथ्वीपासूनचं अंतर इतकं जास्त आहे की ते मोजण्यासाठी सर्वसामान्य एककं वापरता येतंच नाहीत. यासाठी विशेष एकक आहे ते म्हणजे प्रकाशवर्ष. म्हणजेच एका प्रकाश किरणाला संबंधित अंतर पार करायला जितकी वर्षे लागतील तितकं ते अंतर.

3 / 11
आपली सूर्यमाला 5 लाख मैल प्रति तास या वेगाने फिरत आहे. या वेगाने आपल्या आकाशगंगेला एक फेरी मारायला 25 कोटी वर्षे लागतील. शेवटी आपल्या सूर्यमालेने आकाशगंगेला फेरी मारली होती तेव्हा 4.5 अब्ज वर्षे जुन्या पृथ्वीवर डायनासोरचा उदय होत होता.

4 / 11
आकाशगंगेच्या मधोमध एक विशालकाय ब्लॅक होल आहे. त्याचं वजन सूर्याच्या वजनापेक्षा 40 लाख पट अधिक आहे. आतापर्यंत हे ब्लॅक होलला स्पष्टपणे पाहता आलेलं नाही. कारण हे ब्लॅक होल अवकाशात वेगवेगळे वायू आणि धुलीकण यांच्यामागे लपलेलं आहे.

5 / 11
जवळपास 4 अब्ज वर्षांनी आपली आकाशगंगा जवळच्या एंड्रोमेडा आकाशगंगेला धडकेल असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. वर्तमान स्थितीत दोन्ही आकाशगंगा 2.5 मैल प्रति तास वेगाने एकमेकांच्या दिशेने येत आहेत. यो दोन्ही आकाशगंगांची धडक झाल्यानंतर काही ताऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं. आपली पृथ्वी मात्र या धडकेत वाचेल.

6 / 11
आकाशगंगेत अब्जावधी तारे आहेत. यातील काही तारे कमी प्रकाशित आणि कमी वजनाचे आहेत. सूर्यमालेतील सूर्य देखील त्यापैकीच एक आहे. संशोधकांनी म्हटलं आहे, "आपल्या आकाशगंगेत जवळपास 300 ते 400 अब्ज तारे आहेत.

7 / 11
आकाशगंगेत अंधार तयार करणारा पदार्थ मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. त्याला डार्क हालो म्हणतात. त्याचा आकार आपल्या आकाशगंगेच्या तुलनेत खूप मोठा आहे. डार्क हालो आपल्याला पृथ्वीवरुनही स्पष्टपणे पाहता येतो.

8 / 11
आकाशगंगा 150 पेक्षा अधिक प्राचीन ताऱ्यांच्या समुहाने वेढलेली आहे. यात ब्रह्मांडाच्या काही सर्वात जुन्या ताऱ्यांचा समावेश आहे. ताऱ्यांचा हा समुह आकाशगंगेतील या डार्क हालोमध्ये आहे.

9 / 11
आपली आकाशगंगा तिच्या जवळ येणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही आकाशगंगेला गिळंकृत करते. त्यामुळे संशोधकांना आपल्या आकाशगंगेत काही नव्या ताऱ्यांचा शोध लागलाय जे दुसऱ्या आकाशगंगेतील आहेत.

10 / 11
आकाशगंगा मोठ्या प्रमाणात गरम वायू आणि एनर्जी पार्टिकल्स बुडबुड्यांच्या स्वरुपात अवकाशात सोडत आहे. हे बुडबुडे आकाशगंगेच्या केंद्रापासून 20 लाख मैल प्रति तास वेगाने बाहेर पडत आहेत. आपल्या आकाशगंगेने दुसरी आकाशगंगा गिळल्यानंतर मृत झालेल्या ताऱ्यांमुळे तसं होत असावं असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय.

11 / 11
ग्रीन बँक टेलीस्कोपच्या मदतीने निरिक्षण केलं असता 100 पेक्षा अधिक हायड्रोजन गॅसचे ढग 738,000 मैल प्रति तास वेगाने आकाशगंगेच्या केंद्रातून बाहेर पडत असल्याचं दिसलंय. याचा उपयोग गॅसचे बुडबुडे तयार करण्यासाठी होत असल्याचं संशोधक सांगतात.