

पायरेटड फिल्मबाबत गूगल सर्च करु नये. भारतात फिल्म पायरसी करणं हे गुन्हा आहे. यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. इतकंच नाही तर 10 लाख रुपये दंड आणि 3 वर्षांसाठी तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

गर्भपाताबाबत गूगलवर काहीही सर्च करणं हे तुमच्या अडचणी वाढ करणारं ठरु शकतं. भारतात डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करणं बेकायदेशीर आहे.

गूगलवर चुकूनही चाईल्ड पॉर्न किंवा चाईल्ड क्राइमबाबत सर्च करु नये. भारतात अल्पवयीन मुलां/मुलींबाबत कठोर नियम आहेत. चाईल्ड पॉर्न किंवा चाईल्ड क्राइमबाबत सर्च केल्यास पॉक्सो अॅक्ट 2012 च्या 14 के अंतर्गत तुरुंगवास होऊ शकतो.

शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीडितेचं नाव आणि किंवा तिची ओळख पटेल अशी माहिती सर्च करणं गुन्हा आहे. तसेच गूगलवर हॅकिंग आणि स्पॅमबाबतही सर्च करु नये.