PHOTOS : ‘या’ देशात पुरुष शिक्षकांनी शाळेत स्कर्ट का घातले? फोटो पाहून संपूर्ण प्रकरण समजेल

| Updated on: Jun 02, 2021 | 4:15 AM

एका विद्यार्थ्याला शाळेत स्कर्ट घालून आल्यानं त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. यानंतर याविरोधात जोरदार आंदोलन झालं.

1 / 5
स्पेनमध्ये एका विद्यार्थ्याला शाळेत स्कर्ट घालून आल्यानं त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. यानंतर स्पेनमध्ये याविरोधात जोरदार आंदोलन झालं.

2 / 5
या आंदोलनाचं नाव आहे 'कपड्यांचं लिंग नसतं' आणि शाळकरी मुलांच्या या आंदोलनाला शिक्षकांनीही पाठिंबा दिला. इतकंच नाही तर हा पाठिंबा दाखवत शिक्षक स्वतः शाळेत स्कर्ट्स घालून आले आणि त्या वेशात त्यांनी मुलांना शिकवलं देखील.

3 / 5
तो विद्यार्थी वॅलेडोलिडच्या एका शाळेत शिकत होता. त्यांच्या शाळेत एका विद्यार्थ्याचा टीशर्ट पाहून त्याला समलैंगिक म्हणत चेष्टामस्करी करण्यात आली. यानंतर या विद्यार्थ्याला आपला टीशर्ट बदलावा लागला.

4 / 5
ही घटना पाहून या शाळेतील ओर्टेगा आणि बोर्जा  या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी याचा निषेध म्हणून आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शाळेत स्कर्ट घालून येण्याचा निर्णय घेतला.

5 / 5
ओर्टेगा म्हणाला, "स्कर्ट घालून लोकप्रियता मिळवणं असा काही आमचा हेतू नव्हता. यातून आम्हाला केवळ सहिष्णुतेचं वातावरण निर्माण करायचं होतं. म्हणूनच त्यांनी इतर लोकांनाही तसं करण्याचं आवाहन केलं.