कोल्हापुरात राजकीय उलथापालथ, मंत्री मुश्रीफांच्या चिरंजीवाचा गोकुळसाठी अर्ज, भाजपचं कोणीही उपस्थित नाही, चर्चांना उधाण
कोल्हापुरात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंत्री मुश्रीफांच्या चिरंजीवाचा गोकुळसाठी अर्ज केला आहे. हा अर्ज भरताना भाजपचं कोणीही उपस्थित नव्हतं. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघाकडे लागलेले असते. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाल्याते समोर आलं आहे.
आज पासून निवडणुकीसाठी नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळचे सर्वच दिग्गज नेते निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत.
महायुतीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांनी आज पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
गोकुळसाठी नविद हे अर्ज करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र भाजपचा एक ही प्रतिनिधी यावेळी पाहायला मिळाला नाही.
गोकुळ निवडणुकीवरून महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे, असं सध्याच्या घडीला दिसत नाही. त्यामुळे घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.