सात दिवसात पाऊस कोसळणार, आंदोलनानंतर महिलांची सत्ता येणार; फरांडे बाबांची भाकणूक, चर्चांना उधाण

कोल्हापूरच्या बिरूदेवच्या यात्रेत फरांडे बाबांनी भाकणूक केली. या यात्रेसाठी हजारो भक्तांनी हजेरी लावली आहे. देश-परदेशातील लोकांनी देखील हजेरी लावली आहे.

| Updated on: Oct 30, 2026 | 8:18 AM
1 / 5
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रा महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो भाविक हजेरी लावत आहे.  भाविकांकडून विठ्ठल बिरूदेवाचं दर्शन घेऊन भंडाऱ्याचं उधळण केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रा महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो भाविक हजेरी लावत आहे. भाविकांकडून विठ्ठल बिरूदेवाचं दर्शन घेऊन भंडाऱ्याचं उधळण केली जात आहे.

2 / 5

कोल्हापुरातील या यात्रेचा अनुभव घेण्यासाठी देश-परदेशातील नागरिक हजेरी लावत आहे. पट्टणकोडोली या भागात भक्तांची एकच गर्दी जमा झाली आहे. या यात्रेत फरांडे बाबाच्या भाकणूकची जोरदार चर्चा होते. फरांडे भाकणूक ऐकण्यासाठी भक्त आतूर असतात. यंदा फरांडे बाबाने काय भाकणूक केली, जाणून घ्या.

3 / 5

कोल्हापूरच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला सुरुवात झालीये. हजारो भाविक या यात्रेला येत असतात. यंदाबी भाविक पट्टणकोडोलीत पोहोचले आहेत. या यात्रेत फरांडे बाबाची भाकणूक ऐकण्यासाठी भक्तांचे कान आतूर असतात. यंदाही फरांडे यांनी केलेल्या भाकणुकीची चर्चा होत आहे.

4 / 5

यंदा सात दिवसात पाऊस पडेल. राज्यात उलथापालथ होणार आहे. त्यानंतर देशावर महिला राज येईल. मिरची आणि साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी मोठी आंदोलन होऊन लढाया होतील, अशी भाकणुक फरांडे बाबा यांनी केलीय.

5 / 5

पट्टणकोडोलीतील ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us