ICC Womens World Cup : मजुरांच्या मुली, गरीबीशी लढून आज महिला वर्ल्ड कपमध्ये स्वप्न करतायत साकार

Womens ODI World Cup 2025 : यंदाच्या महिला वर्ल्ड कपचे यजमान भारत आणि श्रीलंका आहेत. या वर्ल्ड कपमध्ये मजुरांच्या मुलींनी कमाल केली आहे. आज सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. या मुलींनी आपल्या आर्थिक परिस्थितीशी झुंज देत इथपर्यंतचा प्रवास केला आहे.

| Updated on: Oct 08, 2025 | 3:51 PM
1 / 5
Womens ODI World Cup 2025 : महिला वर्ल्ड कपमध्ये अशा काही खेळाडू आहेत, ज्या आधीपासून सुपर स्टार आहेत. त्यांच्यासाठी वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा हा पहिला अनुभव नाहीय. त्यांच्याकडे ICC टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. (Photo: PTI)

2 / 5
काही महिला खेळाडू अशा आहेत, ज्यांच्यासाठी हा पहिला वर्ल्ड कप आहे. सगळ्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती एकसारखी नसते. काही अशा सुद्धा महिला खेळाडू आहेत, ज्यांना इथवर पोहोचण्यासाठी गरीबीशी संघर्ष करावा लागलाय. (Photo: PTI)

3 / 5
अशा खेळाडूंपैकी एक आहे, भारताची क्रांती गौड. तिची आई मजुरीचं काम करायची. तिच्याकडे पायात घालायला बूटही नव्हते. पण ही महिला खेळाडू सध्या भारताच्या वेगवान गोलंदाजीची मुख्य ताकद बनली आहे. याचवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करणाऱ्या क्रांती गौडने आतापर्यंत 9 वनडेमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत.(Photo: PTI)

4 / 5
महिला वर्ल्ड कपमध्ये खेळणारी  भारताची ऑलराउंडर अमनजोत कौर एक कारपेंटरची मुलगी आहे. पैशांची कमतरता असून सुद्धा तिच्या वडिलांनी तिला क्रिकेटर बनवण्यात कुठलीही कमतरता ठेवली नाही. तिच्या वडिलांना विश्वास होता की, एकदिवस त्यांची मुलगी भारतासाठी खेळेल. आज ते स्वप्न पूर्ण झालय.   अमनजोत कौरने आतापर्यंत 10 वनडे सामन्याकत 155 धावांशिवाय 14 विकेट घेतल्या आहेत.(Photo: PTI)

5 / 5
बांग्लादेशची मारुफ अख्तर सुद्धा गरीब कुटुंबातून येते. तिचे वडील सुद्धा शेतात मजुरी करायचे. मारुफ अख्तर वेगवान गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीला धार आणण्यासाठी ती मुलांसोबत क्रिकेट खेळायची. मारुफ अख्तर बांग्लादेशच्या पेस गोलंदाजीची प्राण आहे. आतापर्यंत 27 वनडेमध्ये तिने 22 विकेट काढलेत. (Photo: PTI)