
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाच्चा कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये वाद बघायला मिळत आहे. एका मुलाखतीनंतर कृष्णा अभिषेक याच्यावर गोविंदा नाराज झालाय.

फक्त गोविंदा हाच नाही तर त्याची पत्नी सुनिता देखील कृष्णा अभिषेक याच्यावर नाराज आहे. थेट एका मुलाखतीमध्ये गोविंदा याने कृष्णा अभिषेकवरील वादावर भाष्य केले होते.

काही दिवसांपूर्वीच कृष्णा अभिषेक याने द कपिल शर्मा शोमध्ये पुनरागमन केले आहे. आता या शोमध्ये परत एकदा कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदा याच्यावर कमेंट मारताना दिसत आहे.

शोमध्ये नंबर वन कोण आहे? यावर चर्चा रंगताना दिसत होती. यावर थेट कृष्णा अभिषेक म्हणाला की, माझा मामा गोविंदा हाच नंबर वन आहे. मामासाठी टाळ्या वाजवा एकदा.

कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदा याच्यासोबतचा वाद मिटवताना दिसत आहे. लहानपणी मामा आम्हाला 2000 रूपये देत असल्याचे कृष्णा अभिषेक याने सांगितल्याने गोविंदा रागावला असल्याचे सांगितले जात आहे.