अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं चोख प्रत्युत्तर, नेमकं काय घडलं?
वाईडच्या निर्णयानंतर कुलदीप यादवचा संताप दिसून आला. मात्र त्याने रागावर नियंत्रण ठेवत पुढच्याच चेंडूवर जॉन कॅम्पबेलला बाद केलं. नेमकं काय घडलं?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात, अम्पायरने दिलेल्या एका वाईड चेंडूच्या निर्णयावर फिरकीपटू कुलदीप यादव चांगलाच नाराज झालेला पाहायला मिळाला.
कुलदीपच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जॉन कॅम्पबेलने षटकार ठोकला आणि त्यानंतरचा चेंडू वाईड दिला गेला, मात्र न डगमगता कुलदीपने पुढच्याच चेंडूवर कॅम्पबेलला बाद करून चोख प्रत्युत्तर दिले.
कॅम्पबेलची विकेट भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची ठरली, कारण कुलदीपने ही विकेट घेत वेस्ट इंडिजची तब्बल १३५ धावांची डोकेदुखी ठरणारी सलामीची भागीदारी संपुष्टात आणली.
कुलदीपने आपला राग गोलंदाजीतून व्यक्त करत ३६ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेतले. या सामन्यात त्याने एकूण ४ विकेट्स घेत भारतीय संघाला अत्यंत मजबूत स्थितीत आणून ठेवले.
एकीकडे कुलदीप यादव आपल्या फिरकीची जादू दाखवत होता, तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा फलंदाज जस्टिन ग्रीव्हज याने १०८ चेंडूंत १०१ धावांची शानदार शतकी खेळी करून संघाचा डाव सावरला.