‘क्योंकी सास भी कभी बहु थी’मधील खलनायकाची ‘नागिन 7’मध्ये एण्ट्री; तुफान चर्चा

एकता कपूरच्या 'नागिन 7' या मालिकेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीला नागिनच्या भूमिकेत प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय. आता लवकरच या मालिकेत एका खलनायकाची एण्ट्री होणार आहे.

| Updated on: Dec 30, 2025 | 9:13 PM
1 / 5
निर्माती एकता कपूरची बहुप्रतिक्षित मालिका 'नागिन 7'चा प्रीमियर नुकताच झाला. 'नागिन'चे याआधीचे सिझन प्रचंड गाजले होते. त्यामुळे या सातव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या नव्या सिझनमध्ये 'उडारियां' फेम अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी मुख्य भूमिकेत आहे.

2 / 5
तिच्यासोबत नामिक पॉलचीही भूमिका आहे. याशिवाय ईशा सिंह आणि एलिस कौशिक यांच्याही मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कनिका मान या मालिकेत ड्रॅगनची भूमिका साकारणार आहे.

3 / 5
तसंच नव्या अपडेटनुसार आणखी एक अभिनेता या मालिकेमध्ये झळकणार आहे. हा अभिनेता टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध खलनायकांपैकी एक आहे. एकता कपूरने अद्याप 'नागिन 7'च्या सर्व कलाकारांची नावं जाहीर केलेली नाहीत.

4 / 5
या मालिकेचे दोन एपिसोड्स प्रसारित झाले आहेत. आगामी एपिसोडमध्ये असे काही कलाकार दिसणार आहेत ज्यापैकी ड्रॅगनची भूमिका सर्वात मोठी मानली जातेय. एकता कपूरने ड्रॅगनच्या भूमिकेसाठी कनिका मानची निवड केली आहे. याशिवाय आकाशदीप सहगल 'नागिन 7'मध्ये दिसणार आहे.

5 / 5
या मालिकेतून तो दमदार पुनरागमन करत आहे आकाशदीपला 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर त्याने 'बिग बॉस'मध्येही भाग घेतला होता. परंतु गेल्या काही काळापासून तो छोट्या पडद्यापासून दूर होता. आता 'नागिन 7'मध्ये तो एका महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या भूमिकेविषयी अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु त्याच्या एण्ट्रीने मालिकेत धमाकेदार ट्विस्ट नक्कीच येणार आहे.