‘लगान’ फेम अभिनेत्री बनली ब्रह्मकुमारी; कधीच लग्न न करण्याचा निर्णय

'लगान', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'गंगाजल' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री ग्रेसी सिंह सध्या अध्यात्माच्या मार्गावर आहे. ग्रेसी ब्रह्मकुमारी झाली असून तिने कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jun 03, 2025 | 1:09 PM
1 / 7
'लगान' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री ग्रेसी सिंह सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ग्रेसीने आता अध्यात्मचा मार्ग निवडला आहे.

2 / 7
अध्यात्मिक शांतीच्या शोधात ग्रेसी सिंहने ब्रह्मकुमारी संस्थेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती नियमितपणे ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होते.

3 / 7
ग्रेसी ध्यान, योग आणि सेवेद्वारे अध्यात्मिक कार्यात गुंतलेली आहे. ती तिच्या अधिकृत वेबसाइटवरही तिच्या या बदललेल्या आणि नवीन आयुष्याची झलक देते.

4 / 7
ब्रह्मकुमारीमध्ये सहभागी झाल्यानंतर ग्रेसीने एका पोर्टलला दिलेल्या जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं, "मला अपार आनंद, शांती, समजुतदारपणा, सुरक्षा, स्वीकृती आणि पाठिंबा अनुभवायला मिळत आहे."

5 / 7
ग्रेसी ही प्रशिक्षित भरनाट्यम आणि ओडिसी नृत्यांगना आहे. ब्रह्मकुमारीच्या कार्यक्रमात ती तिच्या नृत्याद्वारे अध्यात्मिक संदेश देते.

6 / 7
ग्रेसीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती 44 वर्षांची असून तिला तिचं आयुष्य असंच जगायला आवडतं. तिने संतोषी माँ या मालिकेच्या सीक्वेलमध्ये म्हणजेच 'संतोषी माँ- सुनाएं व्रत कथाएं' यामध्ये शेवटची भूमिका साकारली होती.

7 / 7
ग्रेसीचा जन्म 20 जुलै 1980 रोजी दिल्लीत झाला. तिने 1997 मध्ये 'अमानत' या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगान' या चित्रपटात आमिर खानसोबत भूमिका साकारून ती रातोरात स्टार बनली. ग्रेसीने मुन्नाभाई एमबीबीएस, गंगाजल आणि अरमान यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.