लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये गायलं गाणं, 105 वेळा बदल करूनही ठरलं सुपरहिट, खर्च झालेले 1 कोटी रुपये

लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये गायलं होतं हे गाणं, ज्यामध्ये 105 वेळा करुण्यात आला होता बदल. गाण्यावर 65 वर्षांपूर्वी खर्च झालेले 1 कोटी रुपये. प्रदर्शित होताच ठरलं इतकं सुपरहिट की आजही प्रत्येकजण गुणगुणतो.

| Updated on: Aug 08, 2026 | 5:15 PM
1 / 5
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘मुगल-ए-आझम’. के. आसिफ दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आणि निगार सुल्ताना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

2 / 5
चित्रपटातील भव्य सेट, दमदार संवाद, संगीत आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं आजही अजरामर मानले जाते. मात्र, या गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा आहे.

3 / 5
गाण्याला हवा तसा खोल इको इफेक्ट मिळावा यासाठी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी हे गाणं बाथरूममध्ये रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते. त्या काळात आजच्यासारखे आधुनिक ध्वनिमुद्रण तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. त्यामुळे बाथरूमच्या भिंतींवरून आवाजाचा प्रतिध्वनी निर्माण होत असल्याने लता मंगेशकरांकडून तिथे गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.

4 / 5
गाण्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात तब्बल 105 वेळा बदल करण्यात आल्याचेही सांगितले जाते. या अथक मेहनतीनंतर तयार झालेले गाणं पुढे ‘मुगल-ए-आझम’ची ओळख बनले.

5 / 5
‘प्यार किया तो डरना क्या’ हे केवळ एक गाणं राहिले नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक कल्ट क्लासिक बनले आहे. मधुबालांचा अभिनय, लता मंगेशकरांचा आवाज, नौशाद यांचे संगीत यामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us