LED बल्ब की ट्यूबलाईट? वीज बिल अर्ध्यावर आणण्यासाठी काय वापरावे? जाणून घ्या

वीज बिल अर्ध्यावर आणण्यासाठी LED बल्ब वापरावा की ट्यूबलाईट? खोलीच्या आकारानुसार योग्य प्रकाश व्यवस्था कशी निवडावी आणि वीज बचतीचे सोपे उपाय या लेखात वाचा

| Updated on: Jan 05, 2026 | 2:45 PM
1 / 8
आजकाल घरोघरी वीज बचतीसाठी एलईडी (LED) उपकरणांचा वापर केला जातो. जुन्या टंगस्टन बल्ब किंवा सीएफएलच्या तुलनेत एलईडी उपकरणे खूपच कमी वीज वापरतात.

2 / 8
पण एलईडी बल्ब आणि एलईडी ट्यूबलाईट यांपैकी जास्त वीज कोण वापरतं? एलईडी बल्ब आणि ट्यूबलाईटमध्ये कशाचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते? याची आज आपण माहिती घेणार आहोत.

3 / 8
सामान्यतः एका एलईडी बल्बचा वीज वापर ७ ते १२ वॅट असतो, तर एलईडी ट्यूबलाईट १८ ते २२ वॅटची असते. वरवर पाहता ट्यूबलाईट जास्त वीज वापरत असल्याचे वाटत असले तरी दोन्हीमधील प्रकाशाच्या वितरणात मोठा फरक असतो.

4 / 8
LED ट्यूबलाईट ही आकाराने लांब असल्याने सर्व दिशांना समान प्रकाश पसरवते. मोठ्या खोल्या, हॉल किंवा स्वयंपाकघरासाठी एकच २० वॅटची ट्यूबलाईट पुरेशी असते.

5 / 8
LED बल्बचा प्रकाश एका विशिष्ट दिशेला केंद्रित असतो. त्यामुळे एका मोठ्या खोलीत पुरेसा उजेड मिळवण्यासाठी तुम्हाला ९ वॅटचे दोन किंवा तीन बल्ब लावावे लागू शकतात. अशा परिस्थितीत १८-२७ वॅट वीज खर्च होते. तर ट्यूबलाईट केवळ २० वॅटमध्येच तेवढा प्रकाश देते.

6 / 8
जुन्या ६० वॅटच्या बल्बच्या तुलनेत एलईडी उपकरणे वापरल्यास ८० ते ९० टक्के वीज बचत होऊ शकते. हे दोन्ही पर्याय दीर्घकाळ टिकणारे असून, त्यांचे आयुष्य २५,००० ते ५०,००० तासांपर्यंत (सुमारे १०-१५ वर्षे) असते.

7 / 8
त्याशिवाय एलईडीमुळे उष्णता कमी निर्माण होते. ज्यामुळे खोलीचे तापमान वाढत नाही आणि ते पर्यावरणासाठीही सुरक्षित आहेत. जर किंमतीचा विचार केला तर एलईडी बल्ब साधारणपणे १०० ते २०० रुपयांपर्यंत मिळतो. तर ट्यूबलाईटसाठी २०० ते ४०० रुपये मोजावे लागतात.

8 / 8
एखादी मोठी खोली किंवा हॉल असेल तर या ठिकाणी ट्यूबलाईट लावणे कधीही चांगले ठरते. कारण एकाच उपकरणात संपूर्ण खोली उजळून निघते. पण अभ्यासाचे टेबल किंवा लहान कोपऱ्यासाठी एलईडी बल्ब अधिक सोयीस्कर ठरतो. एकूणच, जागेच्या आकारमानानुसार योग्य निवड केल्यास वीज बिल कमी राखण्यास मोठी मदत होते.