
सोमवारी म्हणजेच 29 मार्चला संपूर्ण देशभरात होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे यंदाची होळी नक्कीच थोडी निस्तेज वाटणार मात्र लोकांमध्ये उत्साहावर याचा अभाव दिसत नाहीये. अनेकांनी तर कुटुंबियांसोबत हा सण साजरा करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र अशा परिस्थितीत असे बरेच लोक आहेत जे आपल्यापासून खूप लांब आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही व्हर्चुअल होळी साजरी करू शकता त्यांना हे संदेश पाठवून होळीच्या शुभेच्छा द्या.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, धुलिवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगबिरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!?

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू.. प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू.. अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे… ✨होळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग.. रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!?