
जापानी लग्झरी कार कंपनी लेक्ससने नवी एसयुव्ही Lexus TX सादर केली आहे. अपकमिंग एसयुव्हीचा साईज मर्सिडिज जीएलएस, ऑडी क्यू 7 आणि बीएमडब्ल्यू एक्स 7 इतकी आहे. चला जाणून घेऊयात यातील फीचर्स आणि इतर गोष्टी...(Photo: Lexus)

कंपनीने नवीन गाडी 2024 लेक्सस टीएक्स 350 गाडी पेट्रोल इंजिनसह सादर केली आहे. यात 2.4 लीटर टर्बो चार्ज्ड फोर सिलिंडर पेट्रोल इंजिन पॉवर मिळेल. ट्रान्समिशनसाठी यात 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. (Photo: Lexus)

लेक्सस टीएक्स 500 एच व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम आयन बॅटरी सपोर्ट दिला आहे. ही एक हायब्रिड कार असून पेट्रोल आणि बॅटरीवर चालते. यात 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहेत. (Photo: Lexus)

या गाडीच्या इंटिरियरमध्ये लेदर अपहोल्सट्रीचा वापर केला आहे. यात 12.3 इंचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि 14 इंचाचा इंफोटेनमेंट डिस्प्ले दिला आहे. या गाडीला 22 इंचांचे व्हील आहेत. दुसरीकडे बेस मॉडेलला 20 इंचांचे व्हील आहेत. (Photo: Lexus)

सर्वात पॉवरफुल मॉडेल टीएक्स 550एच प्लस आहे. हे मॉडेल 3.5 लीटर व्ही6 इंजिनसह येते. यात प्लग इन हायब्रिड टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. लेक्ससच्या नवीन लग्झरी एसयुव्हीमध्ये 569 लीटरचं लगेज स्पेस आहे. (Photo: Lexus)