
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत, नीट खायला-प्यायला वेळ नसतो. अशा वेळी घाईत असताना एखादा गरम पदार्थ किंवा पेय खाल्ल्या-प्यायल्याने जीभ भाजू शकते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव कधी ना कधी आला असेल. अशा वेळी जीभ बराच वेळ हुळहुळत राहते, काहीच खाता येत नाही. वेदनाही होत असतात. हा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो. (Photo : Freepik)

जीभ जास्त भाजली असेल तर थंड पाण्याने गुळण्या कराव्यात. हा जीभेची जळजळ कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.थंड पाण्याने जिभेची सूज आणि अस्वस्थता कमी करता येते. जर तुमच्याकडे बर्फ असेल तर तुम्ही तोही जीभेवर चोळू शकता.

अशा वेळी कोरफडीचे जेल वापरणेही उपयुक्त ठरते. यामुळे वेदनांपासून लगेच आराम मिळतो. केमिकल नसलेले जेल किंवा कोरफडीच्या पानांचा ताजा रस लावावा.

जीभ खूप भाजली असेल तर तिथे मध लावा. त्यामुळेही वेदना कमी होऊन आराम मिळतो.

जीभ भाजल्यावर थंड दही लावावे किंवा गार दूध प्यावे, त्यामुळे लगेच आराम मिळतो. तसेच आपल्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते.