समझनेवालो को इशारा ‘कॉफी’! एक कप सहा हजार रुपये, नेमकी इतकी महाग का ते जाणून घ्या

जगभरात कॉफीचे अनेक चाहते आहेत. सकाळी उठल्यानंतर एक कप कॉफी प्यायलं की बरं वाटतं. दिवस फ्रेश जातो असं अनेकांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला जगातल्या सर्वात महागड्या कॉफीबद्दल माहिती आहे का? एक कप कॉफीची किंमत सहा हजार रुपये आहे. जाणून घ्या एक कप कॉफी इतकी महाग असण्याचं कारण काय?

| Updated on: May 31, 2025 | 3:16 PM
1 / 6
एक कप कॉफी घेतली की दिवस कसा एकदम मस्त जातो. कामं करण्याचा उत्साह येतो. तसेच अंगातील मरगळ झटकून जाते. त्यामुळे अनेक जण मूड फ्रेश करण्यासाठी एक प्याला कॉफी घेतात. अनेकांना कॉफीचं व्यसनच असतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

2 / 6
तुम्ही फिल्टर कॉफी, ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी इत्यादी वेगवेगळ्या कॉफीच्या प्रकाराचा आस्वाद घेतला असेल. पण जगातल्या सर्वात महागड्या कॉफीबद्दल तुम्हाला माहिती आहे. पण या कॉफीची किंमत अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. का ते जाणून घ्या.

3 / 6
कॉफी महाग असण्याचं कारण काही वेगळं आहे. कारण ही कॉफी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. या कॉफीचे नाव कोपी लुवाक आहे. एक कप कॉफी पिण्यासाठी तुमच्याकडे 6 हजार रुपये असणं आवश्यक आहे.

4 / 6
कोपी लुवाक ही प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते. सिव्हेट हा मांजरीसारखा दिसणार प्राणी आहे. ही कॉफी त्याने खाऊन टाकलेल्या कॉफी बीन्सपासून तयार केली जाते. म्हणूनच या कॉफीला सिव्हेट कॉफी असंही म्हणतात.

5 / 6
इंडोनेशियात लोकप्रिय असलेली कॉफी इतकी महाग असण्याचं कारण तुम्हाला कळलं असेलच. पण त्याची उत्पादन क्षमता कमी असल्याने सहजासहजी उपलब्ध होत नाही. कारण सिव्हेट पिकलेले कॉफी बीन्स खातो. शेवटी अर्धे पचलेले कॉफी बीन्स विष्ठेतून बाहेर पडतात.

6 / 6
जगातील सर्वात महागडी कोपी लुवाक कॉफी सिव्हेटच्या विष्ठेतून तयार होते. या कॉफीचा सुगंध आणि चव एकदम भारी असल्याचं चाहते सांगतात. पण ही कॉफी सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, हे देखील तितकंच खरं आहे. (सर्व फोटो: टीव्ही 9 नेटवर्क)