
ओवा हा भारतीय पदार्थांमध्ये आढळणारा मसाला आहे. या हर्बल मसाल्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ओवा त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

ओव्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत.

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी देखील ओवा खूप फायदेशीर आहे. यासाठी दूधामध्ये ओव्याची पावडर मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.

कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्समुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. या दोन समस्या कमी करण्यासाठी ओवा अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे दररोजच्या आहारामध्ये ओव्याचा समावेश करा.