
मुंबईत काही असे मार्केट आहेत. जेथे योग्य दरात दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू मिळतात. कपडे, शोभेच्या वस्तू आणि लायटिंगसाठी मुंबईतील काही मार्केट बेस्ट पर्याय ठरतील.

मुंबईतील लोहार चाळीत तुम्ही दिवाळीसाठी शॉपिंग करू शकता. याठिकाणी तुम्हाला वेगवेगळी तोरणं आणि लायटिंग योग्य दरात मिळतील.

भुलेश्वर मार्केटमध्ये महिलांसाठी हवे तसे पारंपरिक उपलब्ध असतात. 12 महिने भुलेश्वर मार्केटमध्ये महिलांची शॉपिंगसाठी गर्दी असते.

वांद्रे येथील असलेल्या हिल रोड मार्केटमध्ये तुम्हाल हवे तसे कपडे आणि दागीने खरेदी करता येतील. या मार्केटमध्ये देखील प्रचंड गर्दी असते.

माटुंगा सेंट्रल मार्केट मध्ये देखील तुम्ही खरेदी करु शकता. याठिकाणी तुम्ही फुलमाळा आणि भाज्या, फळे इत्यादी लागणाऱ्या वस्तूंची शॉपिंग करू शकता.