
आचार्य चाणक्यनी आपल्या ग्रंथात महिलांच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे घरात क्लेश, कलह निर्माण होतो. महिलांच्या काही सवयींमुळे नवऱ्याच आयुष्याच क्लेशाने भरुन जातं.

क्लेश जीवनाचा एक भाग आहे. काही सवयी कोणाच्याही असो, त्याचा नकारात्मक परिणाम होतो. नात्यात तणाव निर्माण होतो. जर, महिलांनी पतीच्या दु:खात साथ दिली नाही, तर त्यांच्या जीवनात क्लेश निर्माण होतो.

काही महिलांना दुसऱ्यांची चुगली करण्याची सवय असते. ही नकारात्मक सवय आहे. अशा व्यक्तीच्या संगतीमुळे तुमच्या आयुष्यातही नकारात्मकता येते. त्यामुळे चुगली करणाऱ्या महिलांपासून शक्य तितक्या लवकर लांब व्हा.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त छळ, कपट करतात. आपल्या याच अवगुणांमुळे अनेकदा त्यांना संकटांचा सामना करावा लागतो. याच सवयींमुळे त्या नवऱ्यापासूनही लांब होतात.

आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा लोभ एक वाईट सवय आहे. चाणक्य यांच्यानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त लोभ असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये पैसा, सोना, हीरा आणि वस्त्र या बद्दल जास्त लोभ असतो. या लोभामुळे आयुष्यात तणाव निर्माण होतो. त्यापासून महिलांनी दूर राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.