
मेथी यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करते. दररोज मेथी पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकता.

एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी बियांमध्ये बेसन आणि दही मिसळून पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. मेथी त्वचेला एक्सफोलिएट करून त्वचा उजळण्यास मदत करेल.

अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी रिकाम्या पोटी प्या.

जर तुमचे केस अकाली पांढरे होत असतील तर यासाठी कढीपत्तासोबत मेथी दाणे वापरा. एका पातेल्यात खोबरेल तेल घेऊन त्यात कढीपत्ता सोबत काही मेथीदाणे गरम करा. हे तेल थंड झाल्यावर गाळून डब्यात ठेवा. आठवड्यातून दोनदा या तेलाची मसाज केल्याने वयाच्या आधी केस पांढरे होण्याची समस्या दूर होते.

नारळाचे तेल मेथीच्या पानांसह उकळवा आणि केसांना लावा. यामुळे तुमचे पांढरे केस काळे होतील आणि तुमचे केस अधिक सुंदर होतील.