
तज्ज्ञांच्या मते, पाय आणि हातांना जास्त घाम येण्याची समस्या असल्यास, त्यांना 15 मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे तुमचे हात आणि पाय थंड होण्यास मदत होते.

अनेक वेळा लोकांच्या पायांना घाम येण्याची समस्या असते. बूट काढल्यानंतर पायांना दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत ते टॅल्कम पावडरची मदत घेऊ शकतात.

संत्र्याची साल उन्हामध्ये ठेवून त्याची पावडर तयार करा. ही पावडर नियमितपणे आपल्या हातांना आणि पायांना लावा. संत्र्याची पावडर हात आणि पायांना लावणे फायदेशीर आहे.

गुलाब पाणी देखील हातांना आणि पायांना लावणे फायदेशीर आहे. यामुळे त्वचेची दुर्गंधी जाते आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

जर तुम्हाला उन्हाळ्यात हात आणि पायांना घाम येण्याची समस्या असेल तर अॅपल सायडर व्हिनेगरची मदत घ्या. यासाठी एका बाटलीत पाणी घ्या आणि त्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करून पायांना लावा.