
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दुपारच्या कडक उन्हामध्ये घराच्या बाहेर पडणे अजिबात शक्य होत नाही. मात्र, निरोगी राहण्यासाठी आणि आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी आपण दररोज सकाळी बाहेर व्यायामासाठी उन्हात जाणे फायदेशीर ठरते.

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा एकमेव स्त्रोत आहे. हे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. याशिवाय सूर्यप्रकाशाचे अनेक फायदे आहेत. यामुळे या हंगामामध्ये सकाळी आपण बाहेर उन्हात फिरले पाहिजे.

सूर्यप्रकाशातील नायट्रिक ऑक्साईड हे व्हॅसोडिलेटर आहे. हे नायट्रिक ऑक्साईड श्वासोच्छवास सामान्य करण्यास, रक्त परिसंचरण सुधारण्यास आणि ऍलर्जीच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

सूर्याची पहिली किरणे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. हे रक्तातील ऑक्सिजन वाढवते आणि आपली त्वचा ताजी आणि तेजस्वी बनवते. शिवाय सकाळच्या हवेतील प्रदूषण कमी होते, त्याचा त्वचेवर कोणताही परिणाम होत नाही.

उन्हाळ्यातील प्रखर सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे त्वचा अत्यंत कोरडी आणि निर्जीव होते. अशावेळी, तुम्हाला दररोज सकाळी 10 मिनिटे सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये बसणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.