उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या 4 फळांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा!

| Updated on: Apr 12, 2022 | 12:23 PM

निरोगी राहण्यासाठी आपले वजन कमी आणि आपल्या BMI प्रमाणे असणे गरजेचे आहे. जर आपल्या शरीरातील चरबी वाढत राहिली आणि वजन सतत वाढत राहिले तर अनेक आजार आपल्याला होण्याची दाट शक्यता असते. यामुळे वजन कमी करणे खूप जास्त फायदेशीर आहे. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये काही फळांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करूनही आपले वाढलेले वजन कमी करू शकतो.

1 / 5

2 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की,काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. विशेष म्हणजे बाराही महिने काकडी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळते. ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे आणि निरोगी राहिचे आहे. अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये काकडीचा समावेश करायला हवा.

3 / 5
खरबूज हे उन्हाळ्यामध्ये सहज मिळणारे फळ आहे. विशेष म्हणजे खरबूज हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये भरपूर पोषक असतात आणि त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. जीवनसत्त्व ए, बी, के, सी, जस्त आणि फायबरचे प्रमाण खरबूजामध्ये अधिक असते.

4 / 5
पिकलेल्या पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. व्हिटॅमिन सी उष्णतेमध्ये तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करते. याशिवाय पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. पपईमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि वजनही कमी होते.

5 / 5
बऱ्याच लोकांचा समज आहे की, आंबा खाल्ल्याने वजन वाढते. मात्र, असे अजिबात नाहीये आपण आंब्याचा आहारामध्ये समावेश करूनही आपले वाढलेले वजन झटपट कमी करू शकतो. मात्र, आंब्याचा रस, ज्यूस आणि बाहेरील आंब्याचे पदार्थ खाणे टाळा. कारण यामध्ये साखर मोठ्या प्रमाणात टाकली जाते आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.