
चमकदार त्वचेसाठी आपण विविध प्रकारची उत्पादने वापरतो. याशिवाय पार्लरमध्ये जाऊन नेहमीच फेशियल करतो. मात्र, हे फक्त काही काळापुरतेच असते, त्यानंतर परत आपली त्वचा खराब दिसण्यास सुरूवात होते.

त्वचेला सखोल पोषण देण्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे. चमकणाऱ्या त्वचेसाठी तुम्ही आहारात अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश करू शकता, त्यात भरपूर पोषक असतात.

अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट असते. ते त्वचा चमकदार आणि हायड्रेटेड ठेवण्याचे काम करते. अॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यामुळेच सुंदर त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये अॅव्होकॅडोचा समावेश करा.

गाजरात व्हिटॅमिन ए जास्त असते. ते सनबर्न आणि बारीक रेषा टाळते. व्हिटॅमिन ए तुमची त्वचा निरोगी ठेवते. हे तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते. यामुळे आपण आपल्या आहारामध्ये गाजराचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे.

ग्रीन टी आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतात. ज्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. ते तुमच्या त्वचेचे पोषण करतात आणि जळजळ कमी करतात.